Beed, मार्च 4 -- Santosh Deshmukh Murder Case Dhananjay Munde Resignation: संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या संतोष देशमुख हत्याकांडाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्यावर संतपाची लाट उसळली आहे. या घटनेची दखल आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून त्यांनी या प्रकरणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना थेट राजीनामा देण्यास सांगितले आहे. सोमवारी रात्री उशिरा देवगिरी बंगल्यावर या संदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे हे उपस्थित होते. या बैठकीत फडणवीस यांनी मुंडे यांना राजीनामा देण्यास संगीतल्याची माहिती आहे. त्यामुळे आज मुंडे राजीनामा देण्याची शक्यता आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा जवळचा आहे. वा...