Delhi, फेब्रुवारी 7 -- Illegal Indian Migrants : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रे दुसऱ्यांदा हाती घेतल्यानंतर अमेरिकेत अवैधरित्या राहत असलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी पाठवण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार १०४ भारतीय देशात परत आले आहेत. त्यानंतर अमेरिकेत अवैधरित्या राहणाऱ्या आणखी ४८७ भारतीयांना माघारी पाठवके जाणार आहेत. याबाबत केंद्र सरकारच्या वतीने शुक्रवारी माहिती देण्यात आली आहे.

पत्रकार परिषदेत या प्रकरणावर बोलताना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, अमेरिकेने केंद्र सरकारला त्यांच्या देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या ४८७ भारतीय नागरिकांची माहिती दिली असून, लवकरच त्यांना भारतात परत पाठवले जाणार आहे. याचे आदेश देण्यात आले आहेत.

अमेरिकेने २९५ लोकांची यादी भारतात पाठवली आहे, जे अमेरिकेत अवैधरित्या राहत होते. त सर्वांना पुन्हा भ...