Delhi, मार्च 1 -- LPG Price 1 March 2025: सरकारने आज गॅससिलेंडरच्या दरात मोठी वाढ केली आहे. आज शनिवारी १ मार्च रोजी एलपीजी सिलिंडरचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. एलपीजीच्या (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) नव्या दरानुसार अर्थसंकल्पाच्या दिवशी मिळालेला दिलासा आज काढून घेत सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा धक्का देण्यात आला आहे. आज पासून १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

आज दिल्लीते मुंबईपर्यंत ही दर वाढ लागू करण्यात आली आहे. तब्बल ६ रुपयांनी हा सिलिंडर महागला आहे. मात्र, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या मार्चमहिन्यातील किमतीचा कल पाहिला तर १ मार्च रोजी झालेली वाढ ही गेल्या ५ वर्षांतील सर्वात कमी वाढ आहे. इंडियन ऑईल पोर्टलवरील आकडेवारीनुसार, मार्च २०२३ मध्ये व्यावसायिक किंमती सर्वाधिक वाढल्या, जेव्हा किंमती एका झट...