भारत, फेब्रुवारी 28 -- Agra Suicide Case : ऊत्तर प्रदेशातील आग्रा येथे अतुल सुभाष आत्महत्या सारखं एक प्रकरण समोर आलं आहे. बहुराष्ट्रीय कंपनी टीसीएसच्या एका मॅनेजरने पत्नीला कंटाळून आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यात रडत त्याने त्याची सर्व व्यथा व्यक्त केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मानव शर्मा असे आत्महत्या केलेल्या टीसीएसच्या मॅनेजरचे नाव आहे. मृत्यूपूर्वी केलेल्या व्हिडिओत मानव शर्मा यांनी पत्नीवर गंभीर आरोप केले आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून ही टोकाचे पाऊल उचलत असल्याचं शर्मा यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. पुरुष संरक्षणासाठी भक्कम कायदा असावा असे देखील शर्मा यांनी म्हटलं आहे. तसेच मृत्यूनंतर आपल्या आई-वडिलांना कोणीही त्रास देऊ नये असं म्हणतं त्याने गळफास घेतल...