Mumbai, फेब्रुवारी 1 -- Tula Japnar Aahe : धमाकेदार मालिकांच्या भाऊगर्दीत आता आणखी एक नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या कथानकामुळे ही मालिका हटके आणि वेगळी ठरणार आहे. 'तुला जपणार आहे' या नव्या कोऱ्या मालिकेचा प्रोमो प्रसारीत झाला आणि प्रेक्षकांमध्ये या मालिकेची चर्चा रंगली. या मालिकेत कोणते कलाकार पाहायला मिळणार यांची सर्वांनाच उत्सुकता होती. तर या मालिकेतून झी मराठीवर शर्वरी लोहोकरे पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे. तसेच, या मालिकेत नीरज गोस्वामी, प्रतीक्षा शिवणकर, मिलिंद फाटक, पूर्णिमा तळवलकर, निलेश रानडे ह्या तगड्या कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.

'तुला जपणार आहे' ही कथा आहे, एका आईची असणार आहे. या आईचं नाव अंबिका असून, तिने आपल्या मुलीच्या संरक्षणाचं व्रत घेतलं आहे. आत्मारुपात ती तिच्या आजूबाजूला असणार आहे. ...