भारत, जून 16 -- Ahmedabad Flight Crash: एअर इंडियाचे विमान अहमदाबादमध्ये कोसळल्याच्या तीन दिवसांनंतर रुग्णालय प्रशासनाने डीएनए सॅम्पलिंगद्वारे आतापर्यंत ८० जणांची ओळख पटवली आहे. यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या नावाचा समावेश आहे. या भीषण दुर्घटनेत २७० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अतिरिक्त नागरी अधीक्षक डॉ. रजनीश पटेल यांनी सांगितले की, डीएनए मॅचिंगच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण ८० मृतांची ओळख पटली आहे. त्यापैकी ३३ जणांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

लंडनला जाणाऱ्या बोईंग ७८७-८ (एआय १७१) या विमानात प्रवासी आणि क्रू सह २४२ प्रवासी होते, त्यापैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत विमानातील एकच जण बचावला आहे. या दुर्घटनेत मेडिकल कॉलेजच्या पाच विद्यार्थ्यांसह २९ जणांचा मृत्यू...