UP, फेब्रुवारी 12 -- उत्तरप्रदेश राज्यातीलबुलंदशहरमधील बीवी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे बॉयफ्रेंडच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून२२ वर्षीय तरुणीने जीवन संपवले आहे.तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाइड नोट लिहिली आहे. यात तिने आपली संपूर्ण कहाणीच सांगितलीअसून याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लग्न तुटल्यानंतर नाराज झालेल्या तरुणीने स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केली. मुलीला ब्लॅकमेल करणाऱ्या प्रियकराने तिचे अश्लील व्हिडिओ आणि फोटोंद्वारे तिला धमकावले आणि दोन लाख रुपयेही उकळले. दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू केला.

'पंतप्रधान मोदींच्या विमानावर होणार दहशतवादी हल्ला', मुंबई पोलिस...