Manipur, फेब्रुवारी 14 -- President's Rule in Manipur : हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये केंद्र सरकारने गुरुवारी राष्ट्रपती राजवट लागू केली. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. ईशान्येकडील राज्य मणिपूर येथे झालेल्या जातीय संघर्षात २५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्यानंतर सुमारे २१ महिन्यांनी सिंह यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. या काळात हजारो लोक विस्थापित देखील झाले आहेत.

राज्यपालांकडून मिळालेल्या अहवालाच्या आधारे राष्ट्रपतींनी असा निष्कर्ष काढला की, मणिपूरमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, भारतीय राज्यघटनेतील तरतुदींनुसार सरकार चालवता येणार नाही, असे गृह मंत्रालयाने एका अधिसूचनेत म्हटले आहे. राज्यातील विधानसभेचे शेवटचे अधिवेशन १२ ऑगस्ट २०२४ रोजी संपले.

यापूर्वी बिरेन सिंह यांनी मणिपूरच...