भारत, फेब्रुवारी 25 -- नोकरी मिळवण्यासाठी पात्रता आणि क्षमता आवश्यक असते, पण चीनच्या एका कंपनीने अनोखी अट घातली आहे. जर तुम्ही अविवाहित आणि घटस्फोटित असाल तर तुम्हाला ऑफिसमध्ये जागा मिळणार नाही. एवढेच नव्हे तर सप्टेंबरपर्यंत अविवाहित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची धमकी देण्यात आली. कंपनीने आपल्या अविवाहित आणि एकल कर्मचाऱ्यांना धमकीचा मेल पाठवला होता, ज्यामध्ये लिहिले होते की, या वर्षी सप्टेंबर अखेरपर्यंत अविवाहित कर्मचाऱ्यांनी लग्न केले नाही तर त्यांना नोकरी गमवावी लागेल. मात्र, टीकेनंतर कंपनीने त्याच दिवशी हा नियम फेटाळून लावला.

पूर्व चीनच्या शेडोंग प्रांतातील शांतीयन केमिकल ग्रुपने जानेवारीमध्ये एक धोरण जाहीर करून कंपनीचा विवाह दर वाढवण्याचे आश्वासन दिले होते. या धोरणांतर्गत शांतीयन केमिकल ग्रुपमध्ये काम करणाऱ्या २८ त...