भारत, फेब्रुवारी 27 -- आदित्य बिर्ला समूहाची कंपनी अल्ट्राटेक सिमेंटने वायर आणि केबल व्यवसायात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर काही कंपन्यांच्या शेअरमध्ये खळबळ उडाली आहे. आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी पॉलीकॅब इंडिया लिमिटेड, हॅवेल्स इंडिया लिमिटेड, केईआय इंडस्ट्रीज लिमिटेड, फिनोलेक्स केबल्स लिमिटेड आणि आरआर काबेल लिमिटेड या पाच वायर आणि केबल कंपन्यांचे समभाग मोठ्या प्रमाणात घसरले. गुरुवारी, २७ फेब्रुवारी रोजी या शेअर्सच्या मार्केट कॅपमध्ये ३३००० कोटी रुपयांहून अधिक (३.८ अब्ज डॉलर) घसरण झाली.

गुरुवारी पॉलीकॅब आणि आरआर काबेलचे समभाग १९ टक्क्यांनी घसरले, तर हॅवेल्स इंडियाचे समभाग ६ टक्क्यांनी घसरून बंद झाले. केईआय इंडस्ट्रीजचे समभाग २१ टक्क्यांनी घसरले, तर फिनोलेक्स केबल्सचे शेअरही ६ टक्क्यांनी घसरले. पॉलीकॅबच्या मार्केट कॅ...