New delhi, मार्च 4 -- वाढती महागाई आणि खर्चामुळे लोक आता मर्यादित कुटुंबाचा मार्ग निवडू लागले आहेत. पण कुटुंब वाढवण्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची जगात कमतरता नाही. टांझानियातील एका व्यक्तीला कुटुंबाचा विस्तार करण्याची अशी नशा चढली की, त्याने २० लग्ने केली आणि त्यातून १०४ मुले झाली. इतकंच नाही तर या व्यक्तीला १४४ नातवंडेही आहेत. पल्स आफ्रिकेने दिलेल्या वृत्तानुसार, टांझानियातील झोम्बे नावाच्या छोट्याशा गावात हे मोठं कुटुंब राहतं.

२० विवाह केलेल्या या माणसाचं नाव आहे मजी अर्नेस्टो मुइनुची. या व्यक्तीने आपल्या प्रत्येक पत्नीसाठी स्वतंत्र घराची ही व्यवस्था केली आहे. शिवाय कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी एकट्या कुटूंब प्रमुखाच्या डोक्यावर नसून जे काम करू शकतात ते स्वत:चे काम करतात. मुईनुची सांगतात की त्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांचे कुटु...