MP, फेब्रुवारी 16 -- मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात एका तरुणाला पाहून काही जण घाबरतात, तर अनेक जण त्याला बजरंगबलीचे रूप मानून पूजतात. खरं तर हा तरुण एका अनोख्या आजाराने त्रस्त आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांच्या नावाची नोंद झाली आहे.

रतलाम जिल्ह्यातील नंदलेटा या छोट्याशा गावचा रहिवासी असलेला ललित पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. देशभरातील प्रसारमाध्यमांमध्ये पहिल्यांदा झळकल्यानंतर आता त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे. ललितच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर लांब आणि दाट केस आहेत. कधी केसांनी झाकलेल्या चेहऱ्यामुळे लोक घाबरायचे आणि चिडवायचे, तर काही जण बजरंगबलीचे रूप मानून पूजाही करायचे. आज संपूर्ण गावाची ओळख निर्माण केल्यानंतर सर्वजण त्याच्याशी प्रेमाने वागतात.

खरं तर ललितला एक आजार आहे, ज्यामुळे त्याच्या चेह...