Bihar, मार्च 26 -- बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत शिकवणाऱ्या महिलेवर मुख्याध्यापक आणि शिक्षक दोघेही प्रेमात पडले. प्रेमाच्या या त्रिकोणात शिक्षक रामाश्रय यादव यांची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील कुशेश्वर स्थान येथे जानेवारी महिन्यात ही हत्या झाली होती. घटनेच्या ५५ दिवसांनंतर पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला तेव्हा आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या. पोलिसांनी मुख्याध्यापकांसह सात जणांना खुनाच्या आरोपाखाली अटक केली असून त्यात तीन हल्लेखोरांचा समावेश आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष चंद्र चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अदलपूर उच्च माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र पासवान आणि शिक्षक रामाश्रय यादव यांचे शाळेतील एका शिक्षिकेसोबत त्रिकोणी प्रेमसंबंध होते. त्यामुळं नेमबाज मुके...