Mumbai, जानेवारी 28 -- Madhurani Prabhulkar In Serial : 'आई कुठे काय करते' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली 'अरुंधती' म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. 'आई कुठे काय करते' या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. छोट्या पडद्यावर या मालिकेने मोठा प्रेक्षक वर्ग निर्माण केला होता. कुटुंबात रमलेली आई ते एक यशस्वी उद्योजिका, असा अरुंधतीचा प्रवास सगळ्यांनाच खूप आवडला होता. 'आई कुठे काय करते' ही मालिका ऑफ एअर गेल्यानंतर अरुंधती काय करतेय, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. या मालिकेत 'अरुंधती'ची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने साकारली होती. मधुराणी प्रभुलकर हिने पुन्हा एकदा या पडद्यावर दिसावे, अशी तिच्या चाहत्यांची इच्छा होती आणि त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.

मधुराणी प्र...