अमृतसर, फेब्रुवारी 16 -- Indian Illegal Immigrants in the US : अमेरिकेत बेकायदा वास्तव्यास असलेल्या ११९ भारतीयांना घेऊन सी-१७ ग्लोबमास्टर विमान शनिवारी रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी अमृतसर विमानतळावर उतरले. निर्वासित नातेवाईकांना घेण्यासाठी त्यांचे कुटुंबीय अमृतसर विमानतळाबाहेर पोहोचले आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्यांदा १०० हून अधिक भारतीयांना अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले आहे.

हद्दपार करण्यात आलेल्या ११९ जणांपैकी १०० जण पंजाब आणि हरयाणातील आहेत. यामध्ये पंजाबमधील ६७, हरियाणातील ३३, गुजरातमधील ८, उत्तर प्रदेशातील ३, गोवा, महाराष्ट्र आणि राजस्थानमधील प्रत्येकी २ आणि हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

बेकायदा स्थलांतरितांच्या दुसऱ्या गटात सहा वर्...