Delhi, जानेवारी 31 -- US Attack on Syria : अमेरिकेच्या लष्कराने गुरुवारी वायव्य सीरियात भीषण हवाई हल्ले केले. या हवाई हल्ल्यात अल कायदाशी संबंधित दहशतवादी मोहम्मद सलाह अल-जबीर हा ठार झाला आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, दहशतवाद्यांचे तळ नष्ट करण्यासाठी आणि त्यांच्या कारवायांमध्ये व्यत्यय आणण्यासाठी हा हवाई हल्ला करण्यात आला. जबीर अल कायदाशी संलग्न असलेल्या हुरास अल-दीन नावाच्या गटाशी संबंधित होता.

दरम्यान, पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्रायलच्या हवाई हल्ल्यात त्यांचा लष्करप्रमुख मोहम्मद दाईफ ठार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इस्रायल डिफेन्स फोर्सेसने (आयडीएफ) त्याची हत्या झाल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. या घोषणेनंतर काही महिन्यांनी हमासने या घटनेला दुजोरा दिल्याने त्याचा मृत...