भारत, जुलै 24 -- ईडीच्या (सक्तवसुली संचालनालय) पथकाने उद्योगपती अनिल अंबानी यांच्या घरावर छापा टाकला आहे. गुरुवारी केंद्रीय तपास यंत्रणेची पथके त्यांच्याशी संबंधित कंपन्यांवर छापे टाकण्यासाठी दाखल झाली होती. ईडीने पीएमएलए अंतर्गत कारवाई केली आहे. तपासाचा एक भाग म्हणून एजन्सीने या गटाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ठिकाणांवरही छापे टाकले आहेत.

चौकशीचा भाग म्हणून ईडीने रिलायन्स अनिल अंबानी समूहावर कारवाई केल्याचे वृत्त आहे. पीएमएलए अंतर्गत सुमारे ३५ ठिकाणे आणि ५० कंपन्यांची चौकशी केली जात आहे. तसेच २५ हून अधिक जण ईडीच्या रडारवर आहेत. मात्र, या काळात त्यांच्या घराचा तपासात समावेश करण्यात आलेला नाही. दिल्ली आणि मुंबईतील ईडीची पथके त्यांच्या समूहातील कंपन्यांच्या आवारात पोहोचली आहेत.

विशेष म्हणजे ईडीची ही कारवाई अशा वेळी होत आहे जेव्हा काही...