भारत, फेब्रुवारी 27 -- उद्योगपती अनंत अंबानी यांच्या 'वनतारा' या प्राणी पुनर्वसन केंद्राला नुकताच केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पातळीवरचा सर्वोत्कृष्ट 'प्राणी मित्र' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. भारतात वन्य प्राण्यांची देखभाल, कल्याण या क्षेत्रात हा सर्वोच्च सन्मान समजला जातो. भारतातील 'कॉर्पोरेट' श्रेणी अंतर्गत 'वनतारा'च्या राधे कृष्णा मंदिर प्राणी कल्याण ट्रस्टद्वारे हस्तींचे बचावकार्य, संरक्षण, उपचार तसेच त्यांची आजीवन काळजी घेतल्याबद्दल असाधारण योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आला. या केंद्रातर्फे आत्तापर्यंत २४० हून हत्तींची सुटका करण्यात आली असून त्यांना साखळी-मुक्त करून, सुरक्षित आणि समृद्ध वातावरण उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये ३० सर्कशीतील हत्ती, वृक्षतोड उद्योगात ओंडके वाहून नेण्यासाठी वापरले जाणारे १०० हत्ती तसेच राइड्...