भारत, मार्च 27 -- अदानी पॉवरचा शेअर गुरुवारी ५ टक्क्यांनी वधारल्याचे दिसून आले. हा शेअर ५२३.९० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. शेअर्सच्या या वाढीमागे एक मोठं कारण समोर आलं आहे. अदानी पॉवर बांगलादेशला वीजपुरवठा करतो. दरम्यान, बांगलादेशकडून वीजेची देयके थकल्यामुळे अदानी पॉवरकडून वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र आता बांगलादेश सरकारने अदानी पॉवरला रक्कम अदा केली आहे. त्यामुळे मुंबई शेअर बाजारात त्याचे पडसाद दिसून आले.
बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डाचे अध्यक्ष रेजाउल करीम यांनी गुरुवारी सांगितले की, आम्ही अदानी पॉवरला नियमित पेमेंट करत आहोत. अदानी पॉवरकडून बांगलादेशला गरजेनुसार वीज मिळत आहे. देयकाचे प्रमाण आणि मागील थकबाकी भरली आहे की नाही हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही. बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डच्या आकडेवारीनुसार अदान...
Click here to read full article from source
To read the full article or to get the complete feed from this publication, please
Contact Us.