Mumbai, फेब्रुवारी 18 -- Avascular necrosis : अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणजेच ऑस्टिओ नेक्रोसिस. यामध्ये हिप्सच्या जॉईंटना रक्तपुरवठा पोहोचत नसल्यानं हाडांच्या ऊती मृत पावतात. तरुणांमध्ये मद्यपानाचे वाढते प्रमाण हे एक चिंतेचे कारण ठरत आहे. ज्याचे दीर्घकालीन परिणाम चिंताजनक आहेत. अति मद्यपानाच्या सवयींमुळे ६०% तरुणांना उतारवयात अव्हॅस्कुलर नेक्रोसिस (AVN)चा धोका असतो. मद्यपान हे ५० वर्षे आणि त्यावरील वयाच्या प्रौढांमध्ये अव्हॅस्कुलर नेक्रोसिसचे प्रमुख कारण ठरत असून त्यांना प्रत्यारोपणाची आवश्यकता भासते.

जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने रक्तवाहिन्यांमध्ये चरबीयुक्त पदार्थ जमा होऊ शकतात. हे हाडांमधील रक्त प्रवाह अवरोधित करतात, परिणामी अव्हॅस्कुलर नेक्रोसिस होतो. पुण्यातील जहांगिर मल्टीस्पेशालिटी रूग्णालयातील ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट स...