New delhi, फेब्रुवारी 20 -- मुंबई, कोलकातासह जगातील अनेक मोठी शहरे अंतराळातून होणाऱ्या विनाशाच्या छायेत आहेत. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने इशारा दिला आहे की, २०२४ वायआर ४ नावाचा एक मोठा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने झेपावत आहे. तो धडकण्याची शक्यता आता वाढून ३.१ टक्के झाली आहे, जी पूर्वी २.३ टक्के होती. मुंबई किंवा कोलकात्यासारख्या दाट लोकवस्तीच्या शहरांना त्याचा फटका बसला तर संपूर्ण परिसर भग्नावस्थेत रुपांतरित होऊ शकतो. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षा या धडकेतून होणारा स्फोट ५०० पट अधिक शक्तिशाली असेल.

या संभाव्य धडकेचा परिणाम पूर्व पॅसिफिक महासागर, उत्तर-दक्षिण अमेरिका, अटलांटिक महासागर, अरबी समुद्र आणि दक्षिण आशियाच्या काही भागात दिसू शकतो. विशेषत: मुंबई, कोलकाता, ढाका, बोगोटा, आबिदजान, लागोस आणि खार्त...