Mumbai, जानेवारी 30 -- Maharashtra Politics : बीडमधील गुन्हेगारीच्या विरोधात अजित पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिलेल्या इशाऱ्याची ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खिल्ली उडवली आहे. 'अजित पवार हे स्वत: आर्थिक घोटाळ्यातील गुन्हेगार आहेत. ते इतरांवर काय कारवाई करणार? त्यामुळं याला सोडणार नाही, त्याला सोडणार नाही हे त्यांनी बोलूच नये,' अशा शब्दांत संजय राऊत यांनी सुनावलं.

अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वत:कडं ठेवल्यानंतर सध्या ते बीडमध्ये आहेत. काल त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बेकायदा व गुन्हेगारी कृत्यांपासून लांब राहण्याचा दम भरला. तसंच, कोणी तसं आढळल्यास सोडणार नाही असा इशाराही दिला.

खासदार संजय राऊत यांनी आज त्यावर भाष्य केलं. 'अजित पवार हे काही तटस्थ वृत्तीचे नेते नाहीत. निष्पक्षपणे नेत्या...