भारत, जून 16 -- अजय देवगणस्टारर 'रेड २' या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. चित्रपटाची कथा आणि कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली. आता हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रितेश देशमुखने खलनायकाची भूमिका साकारली असून वाणी कपूरने एन्ट्री केली आहे. ओटीटी प्रेक्षक या चित्रपटाची वाट पाहत होते. जाणून घ्या हा चित्रपट कोणत्या दिवसापासून कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.

रेड 2 OTT प्रीमियर

अजय देवगणचा रेड २ हा चित्रपट २७ जून २०२५ पासून म्हणजेच पुढच्या आठवड्यापासून नेटफ्लिक्सवर दिसणार आहे. अजय देवगण या चित्रपटात आयआरएस अधिकारी अमेय पटनायक यांच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची कथा अमेय पटनायक यांच्यावर लाच मागितल्याच्या आरोपांपासून सुरू होते. य...