Uttar Pradesh, जानेवारी 27 -- प्रेमाला वयाचं बंधन नसतं आणि मर्यादाही नसते, असं म्हटलं जातं. प्रेम हे ना जात-पाहते, ना उच्च-नीचपणा पाहते. प्रेम कुणालाही व कोणावरही होऊ शकतं. अनेकदा एखाद्या वृद्ध महिलेने तरुण पुरुषाला हृदय दिले, तर कुठे वृद्ध आपल्या नातीच्या वयाच्या मुलीच्या प्रेमात पडल्याच्या घटना घडल्या आहेत. कुटुंबाची, समाजाची पर्वा न करता लोकांनी एकमेकांसोबत राहणे पसंत केले आहे. असाच एक प्रकार यूपीच्या कानपूर जिल्ह्यातून समोर आला आहे. येथे स्वत: आजी बनलेली एक महिला आपल्या प्रियकरासोबत फरार झाली. प्रियकरही महिलेच्या वयापेक्षा खूपच लहान आहे.

कुटुंबाच्या इज्जत पार धुळीला मिळवत ही महिला आपल्या ३० वर्षीय प्रियकरासह पळून गेली. ही बाब कुटुंबीयांना समजताच त्यांनी पोलिस ठाणे गाठले. आठ वर्षांपूर्वी एका तरुणासोबत आजी बनलेली ही महिला फरार झाली होत...