भारत, फेब्रुवारी 22 -- कधी कधी जगात गोष्टी इतक्या वेगळ्या घडतात की लोक नशिबासारख्या गोष्टींवर विश्वास ठेवू लागतात. अशा घटनांची माहिती जेव्हा सोशल मीडियावर येते, तेव्हा ती लोकांमध्ये चांगलीच व्हायरलही होते. अशीच एक घटना चीनमध्ये घडली आहे, जिथे एका तरुण-तरुणीच्या कारचा भीषण अपघात होतो आणि नंतर कालांतराने ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, ३६ वर्षीय ली भरधाव वेगाने कार चालवत असताना या संपूर्ण घटनेची सुरुवात झाली. ली याला एका ठिकाणी लवकर पोहोचायचं होतं, म्हणून तो गाडीचा वेग वाढवत राहिला. त्यावेळी इलेक्ट्रिक बाईकवरून समोरून येणाऱ्या एका महिलेने ली यांच्या भरधाव वेगाने येणाऱ्या कारला धडक दिली. ही घटना इतकी वेगवान होती की, महिलेचे कॉलर हाड तुटले. ली धावत त्या महिलेकडे येतो आणि माफी मागतो. महिलेच...