Uttarakhand, एप्रिल 10 -- उत्तराखंडमध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक विवाहित महिला पतीला सोडून प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला गेली. तर दुसरीकडे पतीनेही पत्नीला सोडून दुसऱ्या महिलेसोबत राहण्याचा निर्णय घेतला.

मुलांच्या संगोपनाबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. डेहराडूनमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डेहराडून येथील एका महिला आणि पुरुषाचे प्रेमप्रकरण इतके वाढले की, दोघेही पती-पत्नी आणि मुलांना सोडून आपआपल्या लव्ह पार्टनरसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला गेले.

आता पीडित पत्नी आणि पीडित पतीने महिला आयोगाकडे तक्रार दाखल करून न्याय मागितला आहे. आपल्या पतीला प्रलोभन देण्यात आल्याचे महिलेचे म्हणणे असून पतीचे म्हणणे आहे की, पत्नीची दिशाभूल करण्यात आली आहे.

महिला आणि पुरुषाचा शोध घेऊन त्यांना लवकर...