New delhi, फेब्रुवारी 2 -- Budget 2025 : १ फेब्रुवारी रोजी संसदेत सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना आयकरातून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत ही सवलत केवळ ७ लाख उत्पन्न असलेल्या लोकांपुरती मर्यादित होती. या निर्णयावर अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की, दरमहा एक लाख रुपये कमावणाऱ्या लोकांवरील कराचा बोजा कमी करण्याचा सरकारचा मानस आहे. त्यामुळे आम्ही प्राप्तिकर सवलतीची मर्यादा ७ लाखांवरून १२ लाख रुपये केली आहे.

सर्वसाधारण अर्थसंकल्पानंतर माध्यमांशी बोलताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की, सर्व उत्पन्न स्तरातील करदात्यांना दिलासा देण्यासाठी सरकार सातत्याने काम करत आहे. १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना करातून सूट देण्य...