Delhi, एप्रिल 26 -- whatsapp in delhi high court : व्हॉट्सॲपने एंड-टू-एंड एन्क्रिप्शन काढण्यास नकार दिला आहे. या बाबत व्हॉट्सॲपने स्पष्ट सांगितले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की एंड-टू-एंड एन्क्रिप्शनद्वारे वापरकर्त्याची गोपनीयता संरक्षित केली जाते. याद्वारे, केवळ संदेश पाठवणारा आणि प्राप्त करणाऱ्यालाच आतमधील मजकूर कळू शकेल याची खात्री केली जाते. कंपनीतर्फे न्यायालयात हजर झालेले तेजस कारिया यांनी दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले की, 'जर आम्हाला एन्क्रिप्शन तोडण्यास सांगितले तर व्हॉट्सॲप भारतातून निघून जाईल.'

व्हॉट्सॲपने दिल्ली उच्च न्यायालयात एन्क्रिप्शन काढण्यास नकार दिला आहे. असे करण्यास भाग पाडल्यास कंपनी भारतातील आपले कामकाज थांबवेल असेही व्हॉट्सॲपने न्यायालयात स्पष्ट केले आहे. वास्तविक, मेटा कंपनीने आयटी नियम २०२१ ला आव्हान दिले आहे. विश...