Mumbai, मार्च 19 -- Madhuri Dixit Son Arin Nene Viral Video: बॉलिवूडची 'धकधक गर्ल' अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने हिने बॉलिवूड मनोरंजन विश्वावर अक्षरशः राज्य केलं आहे. आपल्या किलर हास्याने सगळ्यांची मन जिंकून घेणारी माधुरी दीक्षित तिच्या नृत्यासाठी जितकी प्रसिद्ध आहे, तितकीच ती तिच्या अभिनयासाठी आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. माधुरी दीक्षितच्या नृत्याने आजही लोक घायाळ होतात. डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केल्यानंतर माधुरी दीक्षितने चित्रपटसृष्टीतून बराच काळ ब्रेक घेतला होता. या दरम्यान, ती दोन मुलांची आई झाली. माधुरीच्या मुलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

माधुरीच्या मोठ्या मुलाचे नाव अरिन नेने आणि धाकट्या मुलाचे नाव रायन नेने आहे. मुलांच्या संगोपनासाठी माधुरीने कामातून ब्रेक घेतला आहे. माधुरी दीक्षित हिचा मोठा मु...