Mumbai, मार्च 28 -- Guwahati Digital Beggar Viral Video: ट्रॅफिक सिग्नलवर किंवा चौकाचौकात असहाय्य लोक भीक मागताना दिसतात. त्यांची अवस्थापाहून अनेक लोक त्यांना जेवण किंवा पैशांची मदत करतात. तर, काही जण सुट्टे पैसे नसल्याचे कारण देत त्यांना भीक टाळतात. अशा लोकांसाठी एका भिकाऱ्याने उपाय शोधला आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत संबंधित भिकारी चक्क क्यूआरकोड घेऊन भीक मागत आहे. भीक मागण्याची पद्धत पाहून लोक त्या व्यक्तीला डिजिटल भिकारी म्हणू लागले आहेत.

हा व्हिडिओ काँग्रेस नेते गौरव सोमाणी यांनी एक्सवर शेअर केला. हा व्हिडिओ गुवाहाटीमधील असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओत एक भिकारी क्यूआर कोड वापरून लोकांकडून भीक मागतोय. तंत्रज्ञानाला खरोखर मर्यादा नाहीत. त्यात सामाजिक-आर्थिक स्थितीतील अडथळे दूर करण्याची क्षमताही...