Pune, एप्रिल 26 -- Pune and Mumbai ranks in forgetful passengers: प्रवास म्हटले की गडबड आली. बस, ट्रेन, विमान वेळेत पकडण्यासाठी आपण धावपळ करत असतो. मात्र, याच धावपळीत आपण अनेक गोष्टी विसरत असतो. अशाच विसरभोळ्या प्रवाशांच्या शहाराच्या यादीत पुणे आणि मुंबईने क्रमांक पटकावला आहे. या यादीत मुंबई दुसऱ्या तर पुणे पाचव्या क्रमांकावर आहे. विसरभोळे पुणेकर सर्वाधिक मोबाइल फोन आणि लॅपटॉप बॅग विसरत असल्याची माहिती एका अहवालात पुढे आली आहे.

ऑनलाइन प्रवासी वाहतूक क्षेत्रातील आघाडीची कंपनी उबरने 'लॉस्ट अँड फाऊंड निर्देशांक २०२४' जाहीर केला आहे. यात ही माहिती पुढे अली आहे. या यादीत देशातील काही शहरातील विसरभोळ्या प्रवाशांची माहिती दिली आहे. त्या नुसार या शहरांना क्रमवारी दिली आहे. यात दोन शहरे ही महाराष्ट्रातील आहे. पुणे तिथे काय उणे असे नहेमीच म्हटले ज...