Tamilnadu, मार्च 28 -- MP Ganeshamoorthy dies by suicide over denial of party ticket : देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पक्षातर्फे उमेदवारी देत असतांना उमेदवारी न मिळाल्याने अनेक इच्छुक नाराज होत आहेत. दरम्यान, तामीळनाडू येथील एमडीएमकेच्या खासदार खासदार ए गणेश मूर्ती यांनी तिकीट न मिळाल्याने टोकाचे पाऊल उचलत रविवारी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू असतांना आज गुरुवारी चार दिवसांनंतर त्यांची प्राणज्योत मालवली.

गणेशमूर्ती हे एमडीएमकेचे (वायको पक्ष) इरोडचे खासदार होते. पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्याने ते नाराज होते. यामुळे नैराश्यात गेल्याने ७४ वर्षीय गणेशमूर्ती यांनी रविवारी किटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ही घटना लक्षात येताच त्यांच्या कुटुंबीयांन...