Mumbai, मार्च 28 -- अवघ्या देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती आहे. मराठा साम्राज्याची स्थापना करणाऱ्या शिवाजी महाराजांचा जन्म १६३० मध्ये शहाजी भोसले आणि जिजाबाई यांच्या पोटी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माच्या अचूक तारखेबद्दल विद्वानांची दोन भिन्न मते आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० म्हणजेच फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ रोजी झाला. काही जण तारखेनुसार तर काही जण तिथीनुसार शिवजयंती साजरी करतात. एक शिवजयंती १९ फेब्रुवारी रोजी तर दुसरी शिवजयंती तिथीनुसार साजरी केली जाते.

शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांची शौर्यगाथा घराघरात पोहचावी यासाठी शिवजयंती साजरी करण्यात आली. तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणात सर्वत्र साजरी होत आहे. जा...