Ahmednagar, मार्च 9 -- बारामती अ‍ॅग्रो (Baramati Agro) समूहाच्या कन्नड सहकारी साखर कारखान्यावर ईडीनं (ED) केलेल्या जप्तीच्या कारवाईवर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'ईडीनं केलेली कारवाई बेकायदा आमि रोजकीय सूडभावनेनं आहे. आम्ही याविरोधात लढत राहू,' असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

रोहित पवार यांनी सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट टाकून हे संपूर्ण प्रकरण आणि कारवाईवर भाष्य केलं आहे. 'जप्तीच्या कारवाईबद्दल आम्हाला मीडियातून कळलं आहे. संबंधित यंत्रणेकडून आम्हाला कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्यावर योग्य ते भाष्य करू व कायदेशीर मार्गानं प्रतिसाद देऊ. ईडीच्या तपासाला सहकार्य करत न्यायाचा लढा सुरू ठेवू, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Congress Candidates List: राहुल ग...