भारत, एप्रिल 17 -- वाळवंटात वसलेल्या दुबईमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. पावसामुळे येथे मोठी पूरस्थिती निर्माण झाली असून दुबई प्रशासनाने शाळा बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने अनेक ठिकाणी पाण्यात कार तरंगत असताना दिसत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. जगातील सर्वाधिक व्यस्त विमानतळापैकी एक मानल्या जाणारे दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मंगळवारी तब्बल अर्धा तास संपूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. यादरम्यान, जगभरातून दुबईला येणारी अनेक उड्डाणे इतरत्र वळवण्यात आली होती. वादळाचा सर्वाधिक फटका भारत, पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि ब्रिटनहून दुबईला येणाऱ्या विमानांना बसला. या देशांमधून येणारी अनेक विमाने रद्द करण्यात आली आहे.

दुबईत जोरदार पाऊस झाल्याने नागरिकांनी सोशल मीडियावर पावसाचे अपडेट्स आणि व्हिडिओ शेअर केले आहे. काही व...