Mumbai, एप्रिल 25 -- Rail Neer packaged drinking water bottles supply issue : रेल्वे स्थानकावर रेलनीर या बाटली बंद पाण्याच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे रेल्वे स्थानकावरील केटरर्सनी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) विरुद्ध रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली आहे. आयआरसीटीसीने भर उन्हाळ्यात रेलनीरच्या पुरवठ्यात १ मे पर्यंत कपात केल्याने वेस्टर्न रेल्वे केटरर्स असोसिएशनने फक्त रेलनीरच्या विक्रीचाच आग्रह का ? असा सवाल करत इतर बाटलीबंद पाण्याची विक्री करण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे.

आयआरसीटीसीने रेलनीरचा पुरवठा कमी केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पुणे वगळता दादरच्या पलीकडे मध्यवर्ती मार्गावर, पनवेल वगळून हार्बर मार्गावरील सर्व स्थानके तसेच पश्चिम मार्गावरील वांद्रे टर्मिनसपासून ते सुरतपर्यंत सर्व स्थानकांवर रेल ...