Mumbai, एप्रिल 28 -- Government Job 2024: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (National Hydroelectric Power Corporation Limited) म्हणजेच एनएचपीसीने शिकाऊ उमेदवारांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार nats.education.gov.in द्वारे अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

एनएचपीसीमध्ये एकूण ५७ एकूण रिक्त जागेवर भरती केली जाणार आहे.

आयटीआय अप्रेंटिसशिप: फिटर- २ जागा, इलेक्ट्रिशियन- १३ जागा, ड्राफ्ट्समन- २ जागा, प्लंबर- २ जागा, COPA- १८ जागा.

डिप्लोमा अप्रेंटिसशिप: सिव्हिल- ५ जागा, इलेक्ट्रिकल- ४ जागा आण...