Mumbai, एप्रिल 29 -- Mosquito Bites Survey: सध्या जगभरातच डास आणि डासवर्गीय किटकांमुळे लोक त्रस्त झाले आहेत. अनेक ठिकाणांहून अशा बातम्या कानावर येतच असतात. भारतातही डासांच्या चाव्यामुळे जनता हैराण झाली आहे आणि त्याचा परिणाम त्यांच्या कामावर होऊ लागला आहे, हे नुकत्याच एका सर्व्हेतून समोर आले आहे. नुकताच भारतीयांच्या उत्पादनक्षमतेवर एक सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेतून एका अतिशय धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. भारतात तब्बल निम्म्याहून अधिक लोक हे डासांमुळे हैराण झालेले असून, त्यांची झोपमोड होते आणि याचा परिणाम त्यांच्या कामावर होतो.

डास चावून होणाऱ्या झोपमोडीमुळे तब्बल ५८ टक्के भारतीय त्रस्त असून, अपुऱ्या झोपेमुळे भारतीयांमध्ये थकवा येण्याचं प्रमाण वाढल्याचं एका सर्व्हेमध्ये आढळून आलं आहे. जागतिक मलेरिया दिनाच्या निमित्ताने 'गुडनाइट'द्वारे ...