भारत, एप्रिल 9 -- ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव लिखित 'आमचा बाप आन् आम्ही' या आत्मकथनपर पुस्तकाची २०० वी आवृत्ती लवकरच प्रकाशित केली जाणार आहे. मराठीतील पहिले 'इंटरनॅशनल बेस्ट सेलर' ठरलेल्या या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते येत्या १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी मुंबईत राजभवन येथे समारंभात करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. नरेंद्र जाधव यांनी दिली.

'आमचा बाप आन् आम्ही' हे ज्येष्ठ अर्थतज्ञ, रिझर्व बँकेचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार, राज्यसभेचे माजी खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांनी १९९३ लिहिलेले आत्मचरित्रात्मक पुस्तक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजित चळवळीतून प्रेरणा घेऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात मिसळून गेलेल्या जाधव कुटुंबीयांच्या संघर्षाची कहाणी पुस्तकात मांडली गेली...