भारत, एप्रिल 28 -- manoj jarange will contest vidhan sabha elections : मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला सगेसोयऱ्यांबाबत अल्टिमेटम दिला आहे. आरक्षणाच्या प्रश्नावरून कोणालाही विनंती करणार नसून आरक्षण मिळालं नाही तर थेट विधानसभेच्या आखाड्यात उतरणारच, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे. जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर टीका केली आहे.

जरांगे पाटील म्हणाले, जर मराठा आरक्षणासाठी सगेसोयऱ्याची अंमलबजावणी केली नाही, तर मराठा समाज यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उभा राहणार आहे. मराठा समाज२८८जागांवर उमेदवार उभे करणार असूनमी स्वत: देखील निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले आहे. आमचा कोणत्याही पक्षाला विरोध नाही. केवळ आम्हाला आमचं हक्काचं आरक्षण हवं आहे. जे सगेसोयऱेला विरोध करत आहेत त्या पक्षाचा...