Mumbai, एप्रिल 24 -- RBI Restrictions on Kotak Mahindra Bank : उल्हासनगर येथील कोणार्क अर्बन सहकारी बँकेनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आणखी एका बँकेवर कारवाई केली आहे. खासगी क्षेत्रातील आघाडीच्या कोटक महिंद्रा बँकेवर आरबीआयनं निर्बंध लादले आहेत. त्यानुसार आता कोटक बँकेच्या ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंगवर बंदी असेल. ही बंदी तात्काळ लागू होणार आहे.

२०२२ आणि २०२३ या वर्षांच्या इन्कम टॅक्स विवरणाच्या तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्याच्या पार्श्वभूमीवर आरबीआयनं बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या कलम ३५ अ अंतर्गत ही कारवाई केली आहे. आरबीआयला आयटी इन्व्हेंटरी, पॅच मॅनेजमेंट, युजर अ‍ॅक्सेस, व्हेंडर रिस्क मॅनेजमेंट, डेटा सिक्युरिटी आणि डिझास्टर रिकव्हरीमध्ये महत्त्वपूर्ण त्रुटी आढळून आल्या आहेत. या त्रुटी दूर करण्यात बँकेला अपयश आलं आहे हेही निर्बंधांमागील एक का...