Mumbai, एप्रिल 29 -- Health Benefits of Dancing: दरवर्षी २९ एप्रिल रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय नृत्य दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश जगभरातील नर्तकांना प्रोत्साहन देणे आणि नृत्याच्या विविध प्रकारांना प्रोत्साहन देणे हा आहे. पण तुम्हाला हे माहित आहे का की नृत्याचे अनेक आरोग्य फायदे देखील आहेत? जर तुम्ही कोणत्याही प्रकारचा व्यायाम करत नसाल तर दररोज फक्त १५ ते २० मिनिटे डान्ससाठी काढा. तुमचे आवडते गाणे लावा आणि त्यावर डान्स करा. डान्समुळे संपूर्ण शरीर सक्रिय होते आणि तणावही दूर होतो. आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्त, नृत्याचे असेच काही फायदे जाणून घेऊया.

> डान्समुळे शरीराची लवचिकताही वाढते आणि हाडे मजबूत होतात.

> डान्समुळे तुम्हाला उत्साही वाटते आणि थकवा येण्याची समस्या दूर होते.

> हृदयासाठी डान्स हा एक उत्तम कार्डिओ व्...