भारत, एप्रिल 24 -- IMD Heatwave Alert : भारतीय हवामान खात्यानं मुंबईसह महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. ठाणे, रायगड जिल्ह्यासह मुंबई शहरातील काही भागांत २७ एप्रिल ते २९ एप्रिल दरम्यान उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. यापैकी २७ आणि २८ एप्रिलला उष्णतेचा झळा अधिक जाणवतील, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

आयएमडीच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी आज पत्रकारांना याबाबत माहिती दिली. 'उष्णतेची लाट अँटीसायक्लोनिक सर्क्युलेशनमुळं आहे. या प्रक्रियेमुळं ठाणे, रायगड आणि मुंबईच्या काही भागात पारा वरच्या दिशेनं जाईल, असं त्यांनी सांगितलं.

पुण्यात पाणीबाणी! पाणी चोरी रोखण्यासाठी मुठा कालव्या जवळच्या परिसरात जमावबंदी; तिघांना अटक

मैदानी भागात किमान ४० अंश सेल्सिअस, किनारपट्टीभागात ३७ अंश सेल्सिअस आणि डोंगराळ भागात ३...