Mumbai, एप्रिल 25 -- Gold Silver Price Today : लगीनसराई सुरू झाल्यापासून रोजच्या रोज भाव खाणाऱ्या सोने आणि चांदीच्या भावात आज देखील काही प्रमाणात बदल झाला आहे. सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोनं एक तोळ्यामागे (१० ग्रॅम) अवघ्या १५ रुपयांनी महागलं असून त्याचा भाव ७१८४१ रुपयांवर पोहोचला आहे. तर, चांदी किलोमागे १११ रुपयांनी स्वस्त होऊन ८०५७६ रुपये झाली आहे.

इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) च्या नव्या दरानुसार, गुरुवार २५ एप्रिल रोजी २३ ​​कॅरेट सोनं १५ रुपयांनी महागलं आणि तोळ्यामागे ७१५५३ रुपयांवर पोहोचलं आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव १० ग्रॅममागे १३ रुपयांनी वाढला असून तो ६५८०६ रुपयांवर पोहोचला आहे. तर १८ कॅरेट सोन्याचा दरही आज ११ रुपयांनी वाढून ५३८८१ रुपयांवर पोहोचला आहे. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव ९ रुपयांनी वाढून ४२०२७ रुपयांवर पोहोचला आ...