भारत, एप्रिल 12 -- भारतात डिजिटल माध्यमाद्वारे गेली अनेक दशके वृत्तसेवा देणाऱ्या बीबीसी या ब्रिटनस्थित माध्यमसंस्थेने भारतात त्यांच्या वृत्तसंकलन प्रक्रियेत फेरबदल केले आहे. बीबीसीच्या चार माजी पत्रकारांनी एकत्र येऊन नुकतेच 'कलेक्टिव्ह न्यूजरूम प्रायव्हेट लिमिटेड' ही स्वतंत्र वृत्तसंस्था सुरू केली असून बीबीसीने भारतातील त्यांचा वृत्त प्रकाशनाचा परवाना (न्यूजरुम पब्लिशिंग लायसन्स) 'कलेक्टिव्ह न्यूजरूम' या नव्या कंपनीकडे हस्तांतरित केला आहे. ही नवी कंपनी केंद्र सरकारच्या नव्या थेट परकीय गुंतवणुकीच्या (Foreign Direct Investment) च्या नियमांचे पालन करून भारतात विविध भाषांमध्ये न्यूज कंटेंटची निर्मिती करून बीबीसीला पुरवणार आहे.

ईडीने 'बीबीसी इंडिया'विरोधात परकीय चलन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. ईडीच्या अधिकाऱ्यांनी ब...