New Delhi, मार्च 22 -- Delhi CM Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत आहेत. दिल्लीत एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेली काँग्रेस या संकटात केजरीवालांच्या मागे उभी राहिली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हे केजरीवाल कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. ईडी विरुद्धच्या न्यायालयीन लढाईत केजरीवालांची मदत करणार असल्याचं काँग्रेसनं स्पष्ट केलं आहे.

कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं (ED) काल केजरीवाल यांना अटक केली. ही अटक म्हणजे विरोधकांच्या राजकीय छळाचा भाग आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा : काँग्रेसकडून राज्यातील ७ उमेदवार जाहीर; कोल्हापूरमधून शाहू छत्रपती, पुण्यातून धंगेकर, सोलापुरातून प्रणिती...