Mumbai, एप्रिल 29 -- Mumbai Local News: मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्लॅटफॉर्म २ मध्ये प्रवेश करत असताना पनवेल- सीएसएमटी लोकल ट्रेनचा डबा रुळावरून घसरल्याने घसरल्याने हार्बर मार्गावरील सेवा ठप्प झाली असून मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. ही घटना आज सकाळी घडली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास पनवेल- सीएसएमटी ट्रेनचा डबा घसरला. परिणामी, हार्बर मार्गावरील सेवा ठप्प झाली. याशिवाय, मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या अर्धा तासापासून सीएसएमटी स्थानकात जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्वच लोकल सेवा बंद करण्यात आल्या. लोकलचा वेग कमी असल्यामुळे कोणत्याही प्रवासाला दुखापत झाली...