Mumbai, मे 15 -- बॉलिवूडमध्ये अनेक जॉनरचे चित्रपट बनत असतात. प्रेक्षकांनाही वेगवेगळे चित्रपट आवडतात. दरवर्षी अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात. यातील काही सुपरहिट होतात, तर काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होतात. सद्य घडीला आपण पाहिलं तर, प्रत्येक चित्रपट चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाल्यानंतर ओटीटीवर देखील रिलीज केला जातो. ओटीटीवर रिलीज झालेले चित्रपट प्रेक्षक घरात बसून सहज पाहू शकतात. असे अनेक चित्रपट आहेत जे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले, परंतु ओटीटीवर प्रेक्षकांना खूप आवडले. आपण अशाच चित्रपटांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी थिएटरमध्ये फारशी कमाई केली नाही, परंतु ते ओटीटीवर प्रदर्शित होताच, त्या चित्रपटांना प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले.

आमिर खानच्या प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनलेल्या आणि किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' या चित्रपटाला थिएटरमध्ये...